Top News

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

Loading...

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पुढील वर्षभर सर्व आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बेठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला महाराष्ट्र कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. वर्षभरासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही आमदारांच्या वेतनातील कपातीला मंजुरी दिली आहे. यातून वाचणारा निधी कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल 2020 पासून पुढील वर्षीपर्यंत म्हणजे एप्रिल 2021 पर्यंत 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, 1 मे रोजी राज्यभरात होणारं ध्वजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होईल. कुठलाही महोत्सव किंवा परेड होणार नाही असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

गुटखा खाऊन पचापचा थुंकणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला पोलिसांनी चोप चोप चोपला

मुंबईत वाढता कोरोनाबाधितांचा आकडा; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स

महत्वाच्या बातम्या-

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा अन्…- शोएब अख्तर

‘रामायण’ मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे श्याम सुंदर काळाच्या पडद्याआड

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या