Maharashtra Cabinet | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत काल (28 नोव्हेंबर) दिल्लीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तसेच देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.या बैठकीत मुख्यमंत्रीपदासह मंत्रिपदाबाबत देखील चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे अगोदर मुख्यमंत्रीपदाचे पक्के दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांनी दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. (Maharashtra Cabinet )
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर शिंदे गट हा काही महत्वाच्या खात्यांवर दावा सांगणार असल्याचं कळतंय.मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानं गृहखातं पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. त्याचप्रमाणे अर्थखातं अजित पवारांना हवंय.
कुणाकडे कोणती खाती जाणार?
गेल्या अडीच वर्षांत अजित पवार यांच्याकडेच अर्थमंत्रीपद राहिलेलं आहे. तर, भाजप गृहमंत्रीपद सोडण्याबाबत विचार करू शकते. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केल्यास सर्वाधिक आमदार हे भाजपाचे आहेत. भाजपाकडे 132 आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. त्यानुसार, भाजपकडे 23-25 मंत्रिपदं, शिवसेनेला 9-10 आणि राष्ट्रवादीला 8-9 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Cabinet )
मिळालेल्या माहितीनुसार, गृह, सामान्य प्रशासन, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं, गृहनिर्माण, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास, वन खातं, पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षण सारखी मोठी खाती ही भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात.
अजित पवार यांच्याकडे कोणती खाती जाणार?
तर, शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन खातं, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणी पुरवठा, पशु संवर्धन आणि दुग्धविकास, पणन , आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान ही खाती जावू शकतात. (Maharashtra Cabinet )
यामध्ये अजित पवार गटाला अर्थखातं, सहकार खातं, कृषी, अन्न-नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत-पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा ,महिला व बाल कल्याण खातं जावू शकते. काल झालेल्या दिल्लीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, अधिकृत कोणतीच घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पुन्हा एकदा बैठक होऊन मग निर्णय होईल, अशी माहिती काल माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. त्यामुळे आता पुढे काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष राहील.
News Title : Maharashtra Cabinet Portfolio Allocation
महत्वाच्या बातम्या –
आज मासिक शिवरात्री, भोलेनाथ ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
मोठी बातमी समोर! ‘या’ खात्यावरून भाजप आणि शिंदे गटात वाद?
मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, आता…
मुंबईकरांनो काळजी घ्या!, हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर
निवडणूक आयोगानं बातमी तर शेअर केली, मात्र कमेंट सेक्शन बंद करुन ठेवला!