राणेंना आणखी वाट पाहावी लागणार, मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर!

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार लांबणीवर टाकण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 

मंत्रिमंडळाचा मुहूर्त लांबल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करुन मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या नारायण राणेंचा हिरमोड होणार आहे. कारण त्यांना मंत्रिपदासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी हा विस्तार होणार होता. मात्र आता हा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर ढकलण्यात आल्याचं कळतंय. तसेच या बैठकीत राणेंच्या मंत्रिपदावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं कळतंय.