बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांच्यावर नुकतीचं मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मागील अनेक दिवसांपासून ते घरी राहून आराम करत आहेत. मुख्यमंत्री शासकीय कार्यक्रमास गैरहजर असतात. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrkant Patil) मुख्यमंत्र्याकडे एक मागणी केली आहे.

आरोग्याच्या कारणावरून राज्यावर अन्याय करू नका. 45 दिवसांपासून राज्यातील जनतेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिेलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. पण त्यांनी तोपर्यंत कुणाकडे तरी चार्ज द्यावा. हवं तर सरकारमधील तीन पक्षाचं मिळून एक मंडळ तयार करा. आदीत्य ठाकरेंकडे चार्ज द्या, अशी मागणी चंद्रकातं पाटील यांनी केली आहे.

शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे याचं निधन झालं, त्यावेळी त्यांचे अंतिम संस्कार शासकिय इतमामात करण्याची फाईल 5 तास पडून होती. अशा व्यक्तींवर ही वेळ येत असेल तर इतराचं काय? अशा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. शिवाय महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही, असाही खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, आजपासून राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रमात घेण्यात येतो. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती लावली. विरोधकांनी मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

थो़डक्यात बातम्या- 

चिंताजनक! Omicronच्या धास्तीनं अनेक राज्यांत ‘या’ गोष्टीवर घातली बंदी

काँग्रेस मंत्र्याचा मंत्रीमंडळातून पत्ता कट?, नाना पटोेले म्हणतात…

पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, केंद्र सरकारचं राज्यांना तातडीचं पत्र

“अडीचपट जास्त पैसे दिले, पण संज्या म्हणेल…”, निलेश राणेंची खोचक टीका

“आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More