महापालिका निवडणुकीचा मुहुर्त ठरला! CM फडणवीसांनी दिले संकेत

Maharashtra Civic Polls

Maharashtra Civic Polls l राज्यात अवघ्या काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. अशातच विधानसभेनंतर सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले निवडणुकांचे संकेत :

राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाची त्सुनामी आली. या त्सुनामीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Maharashtra Civic Polls l निवडणुका नेमक्या का रखडल्या? :

सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC कोट्यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यासंदर्भात निकाल याच म्हणजेच जानेवारी महिन्यातच सुनावण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा वाद देखील सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या याचिकेवर देखील लवकरच सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टातील ही दोन्ही प्रकरणे जानेवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत संपण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे राज्यात रखडलेल्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र आता त्या अनुषंगाने हालचालींना देखील वेग आला आहे.

News Title : Maharashtra Civic Polls

महत्वाच्या बातम्या –

शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं निधन!

आज मकर संक्रांती, आपल्या प्रियजणांना द्या ‘या’ हटके शुभेच्छा!

आज मकर संक्रांतीला ‘या’ 3 राशींना येणार सोन्याचे दिवस!

शेतकऱ्यांनो ‘ही’ कामाची गोष्ट लवकर करा अन्यथा… पश्चाताप होईल

वाल्मिक कराडला फाशी द्या! ‘या’ आमदाराने केली मागणी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .