CM Swearing Ceremony l आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीची सत्ता आली आहे. यावेळी भाजपला पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. मात्र अशातच आज या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळणार आहे. कारण आज नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजपच्या गटनेतेपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
शपथविधी सोहळा कुठे व किती वाजता होणार? :
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी 5 डिसेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. हा भव्य शपथविधी सोहळा मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
मात्र या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
CM Swearing Ceremony l सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार? :
याशिवाय आज मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री हे देखील शपथ घेणार आहेत. तसेच या शपथविधी सोहळ्यासाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
त्यामुळे या शपथविधीच्या ग्रँड सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच या शपथविधीच्या सोहळ्यासाठी कलाकार, साधू-महंत, साहित्यिक यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.
News Title : Maharashtra CM Swearing Ceremony
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ नेत्यांची मंत्रीपदी वर्णी?
‘मी अमित शाहांना…’; अजित पवारांनी केला मोठा खुलासा
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही?, फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं
‘मी तर घेणारे शपथ, मी काय थांबणार नाही’; अजित पवारांच्या वक्तव्याने सगळे खळखळून हसले
मोठी बातमी! महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा