महाराष्ट्र मुंबई

पॅकेज जाहीर करू नका, असं नरेंद्र मोदींनीच सांगितलं- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून केली जात आहे. पॅकेज जाहीर करण्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

देशात लॉकडाउन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पाच वेळा बैठका घेतल्या. मागील बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना पॅकेज जाहीर न करण्याचं आवाहन केलं असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

पंतप्रधानांनी सांगितलं होतं की. केंद्राची आणि राज्याची स्थिती सध्या चांगली नाही. पुढील परिस्थितीचा आताच अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे गोंडस वाटणाऱ्या घोषणा करू नका असं ते म्हणाले होते. त्यामुळे राज्य सरकार प्रत्यक्ष मदत करत आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढील 10-15 दिवस काळजीचे आहेत. राज्यातील आणि मुंबईतील रुग्णांची संख्या शिखरावर असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ माजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट करत 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला रामराम

मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथं पत्र; केली ‘ही’ मागणी

एक जूननंतर लॉकडाउन हटवणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या