Maharashtra l विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. अशातच आता ५ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान आज शपथविधीपूर्वीच महायुतीच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली आहे. यावेळी संजय शिरसाट, गुलाबराव पाटील हे उपस्थित होते.
आज महत्वाची बैठक होणार :
भाजप नेत्यांनी आझाद मैदानाच्या पाहणी नंतर शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यातून जनतेमध्ये चुकीचा संदेश देखील जात असल्याच म्हटलं होतं. कारण पाच तारखेला संध्याकाळी आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी आज भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी मैदानाची पाहणी केली आहे.
महायुतीच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज दुपारी सह्याद्रीवर एक महत्वाची बैठक आयोजित केलेली आहे. ती बैठक घेतल्यानंतर कदाचित आज संध्याकाळी महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता संजय शिरसाट यांनी दिली आहे.
Maharashtra l संजय शिरसाट काय म्हणाले? :
यासंदर्भांत संजय शिरसाट म्हणाले की, आझाद मैदानात शपथ विधी सोहळ्यासाठी आमदारांच्या बैठकीची व्यवस्था कुठे केली आहे? तसेच किती गेट आहेत? शपथविधीसाठी ज्यांना निमंत्रित केल आहे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील एन्ट्री कुठून आहे? या सगळ्याची पाहणी करण्यासाठी आम्ही होतो असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
News Title – maharashtra cm will be decide on 4 th december
महत्त्वाच्या बातम्या-
स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?
अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार
कंबोज म्हणाले; “गजाभाऊला उचलून आणणार”; ठाकरे गटाचा नेता म्हणाला…
लग्नसराईत सोन्याची आनंदवार्ता; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव