राहुल गांधी- महाराष्ट्र काँग्रेस बैठक संपली; विधानसभेसाठी ‘या’ पक्षाला सोबत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्यात नवी दिल्ली येेथे बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय झाला आहे.
यासंदर्भात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीशी लवकरच चर्चा करणार आहे. 3 जुलै रोजी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काँग्रेस नेते चर्चा करणार आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर जागावाटपाची बोलणी होईल, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबरच वंचितलाही सोबत घेण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी???
-…म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉटेलमध्ये भांडी घासतोय! ‘संघर्षाला सलाम…’
-“मुलं होण्यासाठी लग्न करण्याची गरज नाही; मी लग्नाच्या आधी आई होण्यास तयार”
-लोकसभेत पूनम महाजनांचा पंडित नेहरूंवर हल्लाबोल; म्हणाल्या…
-कंगनाकडून आदित्यने 1 कोटी रुपये उकळले; रंगोलीचा आरोप
Comments are closed.