बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर… ‘या’ नेत्यांचा झाला समावेश

मुंबई | गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ आणि आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या कार्यकारिणीत काही फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. काँग्रेसचे दिवगंत नेते आणि गु़जरातचे प्रभारी राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची प्रदेश उपाध्याक्ष म्हणून निवड केली आहे. राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर त्या राजकारणात येतील की नाही याबद्दल साशंकता होती. पण, आज त्यांच्या निवडीमुळे त्या सक्रीय राजकारणात येतील हे स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नविन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष, महासचिव, सचिव आणि प्रवक्ते यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या यादीत काँग्रेसच्या नविन 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही पद नाही, त्यांच्याकडे शिस्तपालन समितीचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे.

या नव्या कार्यकारिणीमध्ये तरूण नेेत्यांचा जास्त समावेश झालेला दिसत आहे. काँग्रेस नेते माणिक जगताप यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीस जबाबदारी देण्यात आली आहे. आशिष देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या खांद्यावर सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा मुलगा शैलेश पाटीलची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह सचिन गुंजाळ यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. या प्रदेश कार्यकारिणीत वेगवेगळ्या जातींचा समतोल राखला आहे. तसेच दोन तृतीयपंथियांना सचिव म्हणून निवडण्यात आलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

मोठी खलबतं… अखेर पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

धोका वाढतोय! मुंबईत आजही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाजा आजची आकडेवारी

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाचा आजची आकडेवारी

‘भारताने पाकिस्तानसोबत….’; तालिबान्यांचा काश्मीरबाबत भारताला ‘हा’ सल्ला

काबूल विमानतळावरील पाणी बॉटल आणि जेवणाची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More