महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 124 वर; मुंबई-ठाण्यात नवे रुग्ण सापडले

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे. मुंबई-ठाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. काल दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर गेली होती.

सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं होतं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. मुंबईत आणखी 9 जणांना, तर ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

पुण्याच्या नायडू रुग्णालयातून काल पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त ठरलेल्या पुण्याच्या दाम्पत्याला सकाळी डिस्चार्ज मिळाला होता.

पिंपरी-चिंचवडमधल्या पहिल्या तीन ‘कोरोना’ग्रस्तांनाही घरी सोडण्यात येणार आहे. पुण्याच्या दाम्पत्यासोबतच दुबईचा प्रवास करुन आलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तिघा ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्णांचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

दिलासादायक! पुण्यात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त, 48 तासांत एकही नवा रुग्ण नाही

ठाकरे सरकारच्या राज्यात पोलीस बेफाम, पत्रकाराला केली मारहाण

महत्वाच्या बातम्या-

‘देवदूतां’च्या मदतीला सिद्धिविनायक; लॉकडाऊनमध्ये पोलिसांसाठी जेवणाची सोय

कौतूकास्पद! Parle G कंपनी पुढच्या 3आठवड्यात वाटणार 3 कोटी बिस्किट पुडे

“ आईशपथ, मी संजय राऊत यांना प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या