बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

आज महाराष्ट्रात 06 हजार 727 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 10 हजार 812 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 101 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 60 लाख 43 हजार 548 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 58 लाख 925 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 17 हजार 874 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल. पण आता महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या

आर्थिक दिलासा! कोरोना उपचारासाठी खर्च झालेल्या रकमेवर मिळणार इन्कम टॅक्स सवलत

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

‘काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखं बरळू लागले आहेत’; गोपीचंद पडळकरांचा थोरातांना टोला

“राज्यपाल धनखड भ्रष्टाचारी आहेत, त्यांना काढून टाकलं पाहिजे”

“महाराष्ट्रात दररोज 15 लाख लोकांचं लसीकरण करण्याची सरकारची तयारी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More