बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

आज महाराष्ट्रात 9 हजार677  नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 10 हजार 138 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 165 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 60 लाख 17 हजार 035 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 57 लाख 62 हजार 661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 20 हजार 715 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.

 

थोडक्यात बातम्या- 

‘…मग संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली’; चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

‘मी फार वर्ष असले उद्योग केलेत’; बिगर भाजप आघाडीबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

‘परमबीर आयुक्त पदावर होते त्यावेळी…’; ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

“सुप्रियाताईंची धडपड केविलवाणी, लोकसभा निवडणुका नसल्याने ताई पुण्यात जास्त नसतात”

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास इतक्या लाख जणांना संसर्ग होण्याची शक्यता”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More