बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! महाराष्ट्रात बरे होणाऱ्यांची संख्या घटली; नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक

मुंबई | गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्ण संख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर येत असताना आजची आकडेवारी काही प्रमाणात चिंता वाढवणारी आहे.

आज महाराष्ट्रात 09 हजार 830 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 5 हजार 890 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 236 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 59 लाख 44 हजार 710 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 56 लाख 85 हजार 636 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 16 हजार 026 जणांनी आपला प्राण गमावला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 39 हजार 960 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिल्यास तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल. पण आज रूग्णसंख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

“गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली आता पुढच्या पिढ्यांची रोहित पवारांमुळे होईल”

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं

मास्क न घालणाऱ्यांना झेडपी तिकीट नाही- सुप्रिया सुळे

‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; आप आणि काँग्रेसची ‘या’ संताला ऑफर???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More