बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोना आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 852 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली असून 665 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 34 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 8 हजार 106 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण (Active Corona Patient) उपचार घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 32 हजार 723 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 80 हजार 061 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 891 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Death) झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 51 लाख 55 हजार 293 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

नवाब मलिकांच्या घराची रेकी करणारे नेमके कोण?, मलिकांनी फोटो ट्विट करत…

संप मिटण्याची शक्यता! कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सुरूवात

मोठी बातमी! कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटूंबियांना राज्य सरकारची मदत जाहीर

“जेव्हा मुंबईत हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते”

“23 वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More