बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

दिवसभरात राज्यात 07 हजार 243 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 10 हजार 987 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 196 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 59 लाख 38 हजार 734 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96.15 टक्के एवढं झालं आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“चार मुलं असलेले भाजपचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार”

महत्वाची बातमी! पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट तयार करणार रशियन कोरोना रस

खुशखबर! सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा तब्बल दहा हजार रुपयांनी उतरले

पुण्यातील कोरोना आला आटोक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तारीख जाहीर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More