बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

मुंबई | गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्ण संख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.

आज महाराष्ट्रात 12 हजार 207 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच आज 11 हजार 449 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 393 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 58 लाख 76 हजार 087 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 56 लाख 08 हजार 753 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 3 हजार 748 जणांनी आपला प्राण गमावला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 60 हजार 693 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.

थोडक्यात बातम्या

नरेंद्र मोदी देशातील आणि भाजपचे सर्वात मोठे नेते- संजय राऊत

कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास मेंदुवरही होऊ शकतो परिणाम!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून स्थानिक नागरिक आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! एका झाडावर घेतलं 22 जातींच्या आंब्यांचं उत्पादन

सुशांतच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, बायोपिक प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More