बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या जाणून घ्या एका क्लिकवर!

मुंबई | महाराष्ट्रात आज रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही महिन्यांपुर्वी पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं होतं. परिणामी रुग्ण संख्याही घटली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत आता घट होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 661 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 896 रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 10 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 58 हजार 045 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.06 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! आसाराम बापू एम्स रुग्णालयात दाखल

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर! आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

“…त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे”

“पालकमंत्री नसल्याने नगर जिल्ह्यावर कोणाचं लक्ष नाही”

“…नाहीतर नारायण राणेंचं मंत्रिपद जाऊ शकतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More