Top News देश

महाराष्ट्रातला मृत्यूदर गुजरात मध्य प्रदेशपेक्षा कमी, मात्र संसर्गाचा दर अधिक…

मुंबई |  महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचं प्रमाण जरी सर्वाधिक असलं तरी इतर राज्यांच्या तुलनेत मृत्यूदर हा कमी आहे. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदर हा कमी आहे.

पश्चिम बंगालचा मृत्यूदर हा 8.40, गुजरातचा 5.99 आणि मध्य प्रदेश 4.51 एवढा आहे तर या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.49 इतका आहे. जागतिक मृत्यूदराचं प्रमाण 6.61 इतकं आहे.

महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात आतापर्यंतची सर्वांत उच्चांकी वाढ झाली. काल दिवसभरात राज्यात 2940 नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्याचा एकूण आकडा 44582 झाला आहे. गेल्या 5 दिवसांत जवळपास 11 हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाचं वाढणारं प्रमाण चिंतीत करणारं आहे.

काल एकाच दिवसात 857 लोक बरी झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 12 हजार 883 इतकी झाली आहे. एकंदरित झपाट्याने वाढ होत असली तरी रूग्णाचं बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

महत्वाच्या बातम्या-

सर्वसामान्यांसाठी छगन भुजबळांनी केंद्र सरकारकडे केली ही महत्त्वाची मागणी

बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?- संजय राऊत

अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला; ‘या’ चार मुद्द्यांवर चर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या