बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक होताना पाहायला मिळाला. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आता रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

महाराष्ट्रात दिवसभर लाॅकडाऊन असल्यामुळे नागरिक घराबाहेर  पडत नाहीत परिणामी रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 12,557 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच आज तब्बल 14 हजार 433 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आलं  आहे.

24 तासात 233 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असताना आज हे दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबईतुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या 1 लाख 85 हजार 527 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या 1 लाख 130 एवढी झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागु करण्यात आला. आता लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच रूग्णसंख्या आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. तसेच आता टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र अनलाॅक देखिल होत आहे.

थोडक्यात बातम्या

‘या’ जिल्ह्यात 2 आठवड्यात कोरोना रुग्णांची तब्बल 13 कोटींची लूट; तपासणीत धक्कादायक माहिती आली समोर

महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

आनंदाची बातमी! पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

खुशखबर! अनलिमिटेड इंटरनेट पॅकसाठी ‘ही’ महापालिका चक्क विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार 1 हजार रुपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More