बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; रिकव्हरी रेट 92.12 टक्यांवर

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातील आजच्या आकडेवारीत रुग्णवाढीपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 26 हजार 672 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात तब्बल 29 हजार 177 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात सध्या 3 लाख 48 हजार 395 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आज राज्यात 594 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.59 टक्के एवढा आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना पाहायला मिळत आहे. असाच आकडा कमी होत राहिल्यास महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 51 लाख 40 हजार 272 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे महाराष्ट्रात हळूहळू रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

“महाराष्ट्राच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी आहे”; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य

दिलासादायक! मुंबईतील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

11 हजारांसाठी रुग्णालयाने ठेवून घेतलं महिलेचं मंगळसूत्र; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

पुण्यातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! आयपीएलचे सामने आता ‘या’ देशात खेळले जाणार; BCCI करणार घोषणा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More