बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात 21 हजार 776 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 13 हजार 659 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 300 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 58,19,224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 95 टक्क्याजवळ पोहोचला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा असल्याचं सांगितलं जात आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून आलं होतं. आज दिवसभरात पुण्यातुनही मोठ्या प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, आज पुण्यात दिवसभरात अवघ्या 380 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-  

राष्ट्रवादीच्या आमदारानं उडवली संजय राऊतांची खिल्ली, म्हणाले मी तर आता घाबरलो!

सनी शॉटसाठी तयार होत असताना मागून एकाने…; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

कौतुकास्पद! पुण्यात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा उपक्रम

पुण्यात सोमवारपासून नवे नियम लागू; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

PPE किट घालून ‘या’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर केलेलं आंदोलन ठरलं लक्षवेधी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More