बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे.

दिवसभरात 2 दिवस लाॅक़डाऊन असताना सुद्धा राज्यात तब्बल 63 हजार 294 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला  मिळालं, आज 349 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 65 हजार 587 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनच्या दिशेने बैठकांचं सत्र सुरू आहे. आता तरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का? की, नेहमीसारखं बेजबाबदार वागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे.  दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 6 हजार 679 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

शरद पवारांच्या सातारच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील!

तृतीयपंथियांमध्ये खुनी खेळ, 55 लाखांची सुपारी देऊन दुसऱ्या गँगच्या म्होरक्याला मारलं!

राजेश टोपेंनी सांगितले टास्क फोर्सच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

वृद्धाची हत्या करुन गावाबाहेर नेऊन पुरलं, मात्र कुत्र्यांनी…

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More