बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

दिवसभरात राज्यात 15 हजार 169 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात 57 लाख 76 हजार 184 नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 16 हजार 16 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण राज्यात उपचार घेत आहेत.

एकीकडे नवे करोनाबाधित आणि मृतांचे आकडे खाली येत असताना दुसरीकडे राज्यातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे आकडे वाढू लागले आहेत. आज दिवसभरात राज्यात एकूण 29 हजार 270 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, आजपर्यंत राज्यात तब्बल 54 लाख 60 हजार 589 रुग्णांनी करोनावर मात करून सुखरुप घर गाठलं आहे. त्यामुळेच राज्याचा एकूण रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे एकूण बाधित सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत 94.54 टक्के इतकं झालं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ राज्याने 12 वीच्या बोर्डाची परीक्षा केली रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची- मुख्यमंत्री

दोन चित्रपटांनंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर; मेकर्सनं केला खुलासा, म्हणाले…

“भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय”

डान्सर राघव जुयाल कोरोनाग्रस्तांची करतोय मदत, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘मलायका तरीही तू म्हातारीच दिसतेस’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका सोशल मीडियावर ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More