बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; मृत्युसंख्येत नवा विक्रम

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हं दिसून येत नाही. त्यातच भर म्हणून महाराष्ट्रात आज दिवसभरात 39 हजार 544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. असून आतापर्यंतची एका दिवसातील विक्रमी वाढ रुग्णांचा मृत्यूमध्ये झाली आज तब्बल 227 जणांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एकुण 23 हजार 600 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून आज पर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या 24 लाख 727 एवढी झाली आहे.

एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही कमी होऊन 85.34 टक्के झाल्याचं दिसुन येत आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 3 लाख 56 हजार 243 सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आता तरी लोक नियमांचं पालन करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये अंशतः लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. तसेच, काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. परंतु, तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संपुर्ण वाहतुक व्यवस्था 15 दिवस बंद

लेकीला सांभाळायला कोणीच नाही; म्हणून स्वतःसोबत बॉक्समध्ये घेऊन फिरतोय डिलिव्हरी बॉय, पाहा व्हिडीओ

धक्कादायक!!! बेरोजगारीला कंटाळुन पुण्यात इंजिनिअर तरूणाने उचललं हे टोकाचं पाऊल

लॉकडाऊन रद्दच्या निर्णयाचा जल्लोष आला अंगलट; इम्तियाज जलील यांच्यावर झाली ‘ही’ कारवाई

महाराष्ट्रात 2 एप्रिलपासुन मर्यादित लाॅकडाऊन?; वाचा कसं असु शकतं स्वरूप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More