बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रविवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, पाहा आकडे

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा काही ठिकाणी लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे.

रविवारी दिवसभरात कडक वीकेंड लाॅक़डाऊन असताना सुद्धा राज्यात तब्बल 63 हजार 294 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, दिवसभरात तब्बल 349 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना काल हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 65 हजार 587 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

महाराष्ट्रात रविवारपर्यंत 27 लाख 82 हजार 161 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही 81.65 टक्के एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही हळूहळू कमी होत असताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय.

महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल 12 हजार 377 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून जिल्हाभरात 87 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी दिवसभरात पुण्यातुनही धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

दीदी तुम्हाला राग आला तर मला शिव्या घाला- नरेंद्र मोदी

मराठमोळी संगीतकार जोडी अडचणीत, ‘या’ कारणामुळे पोलिसात तक्रार दाखल

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर जोरदार पावसाचं सावट, हवामान खात्याचा इशारा

रुग्णसंख्या हजारात पण शिल्लक बेड बोटावर मोजण्याएवढेच; ‘या’ शहरातील विदारक परिस्थिती

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली, वाचा सविस्तर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More