बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

आज दिवसभरात राज्यात 21 हजार 081 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 10 हजार 219 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 154 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच आतापर्यंत 1 लाख 470 रूग्णांच्या मृत्युची महाराष्ट्रात नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 55,64,348 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 95 टक्क्यांजवळ पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत 58 लाख 42 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून आलं होतं. आज दिवसभरात पुण्यातुनही मोठ्या प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, आज पुण्यात दिवसभरात अवघ्या 177 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“लसीबाबत शंका उपस्थित करणारे भोळ्याभाबड्या बहीण-भावांच्या जीवनाशी खेळ करत आहेत”

ब्रेकिंग! पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, पाहा व्हिडीओ

देशातील खासगी रुग्णालयात ‘या’ किंमतीपेक्षा अधिक किमतीत लस विकता येणार नाही; पंतप्रधानांची घोषणा

पंतप्रधान गरीब योजनेतून ‘या’ महिन्यापर्यंत जनतेला मिळणार मोफत राशन

महिला ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More