महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्राची रूग्णसंख्या साडेचार लाखांच्या आसपास तर या शहरात सर्वाधिक अ‌ॅक्टिव्ह रूग्ण…

मुंबई |  महाराष्ट्राला कोरोनाने घातलेला विळखा काही सैल होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 509 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर दुर्दैवाने 260 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या साडे पंधरा हजारांपार पोहचली आहे.

पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक हैदोस पाहायला मिळत आहे. दररोज दीड हजारांच्या आसपास रूग्णसंख्या वाढते आहे. राज्यात सध्या पुण्यातच सर्वाधिक कोरोना अ‌ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात कोरोनाचे 44 हजार 201अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसरीकडे कोरोना संसर्गाचा वेग जरी अधिक असला तरी रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. काल नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक होती. 9 हजार 509 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली होती तर 9 हजार 926 रूग्ण कोरोनामुक्त झाले होते.

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट सुधारून तो जवळपास 63 टक्के इतका झाला आहे. तसंच मृत्यूदर 3.53 टक्के इतका आहे. आतापर्यंत 22 लाख 55 हजार 791 करोना चाचण्या करण्यात आल्या असून यामधील 4 लाख 41 हजार 228 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

देशातल्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, रूग्णालयात केलं दाखल

हनुमान गढी महंतांची उद्धव ठाकरेंवर टीका; मुख्यमंत्र्यांची मंथरेशी केली तुलना

माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; कारण आहे अत्यंत धक्कादायक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या