Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज 821 रूग्णांना डिस्चार्ज; पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

मुंबई |  राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. परंतू कोरोनाबाधितांचा आकडा काही कमी होण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये.

राज्यात आज 2608 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 47 हजार 190 वर पोहचला आहे.

दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यातील 821 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. विविध रूग्णायलांमध्ये हे रूग्ण उपचार घेत होते. आज दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दिवसभरात 60 जणांना कोरोनामुळे मृत्यूला सोमोरे जावं लागलं आहे.

दरम्यान, हॉटस्पॉट क्षेत्रातील चाचण्याचं प्रमाण देखील शासन आणि प्रशासनाने वाढवलं आहे. त्यामुळे आता कोरोनाची लढाई निकाराने लढण्यास प्रशासन सज्ज झालं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

पुण्याच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भाजपची कृती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच- सचिन सावंत

…म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतोय; हर्षवर्धन जाधव यांचा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या