मुंबई | कोरोना संसर्ग वाढीचा वेग काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. टाळेबंदी करून देखील कोरोनाचे नवीन रूग्ण दररोज मोठ्या संख्येने मिळत आहे. कालच्या एका दिवसात तब्बल 10 हजारपेक्षा अधिक नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ३७ हजार ६०७ एवढा झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कालच्या दिवसभरात ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ इतक्या जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूदने उचललं मोठं पाऊल
‘वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, ‘स्व’-रुपवर्धिनीचे ज्ञानेश पुरंदरे यांचं निधन
सुशांतसाठी अंकितानं लिहिली आणखी एक पोस्ट, पोस्टमध्ये म्हणते…