बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

दिवसभरात राज्यात 06 हजार 126  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 07 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 177 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 61 लाख 17 हजार 560 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 97 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र शनिवारी दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. सर्व मैदानं आणि बागा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालये पुर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’- प्रविण दरेकर

मोठी बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत पुन्हा बदल

बुमराह-शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती

कौतुकास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली आयएसएस, देशात मिळवली 12वी रॅंक

मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More