बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक होताना पाहायला मिळाला. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आता रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे.  प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

महाराष्ट्रात दिवसभर लाॅकडाऊन असल्यामुळे नागरिक घराबाहेर  पडत नाहीत परिणामी रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 14,123 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच काल तब्बल 35 हजार 949 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आलं  आहे.

काल 477 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असताना काल हे दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबईतुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या 2 लाख 30 हजार 681 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या 96 हजार 198 झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. आता लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करत असताना पाहायला मिळत आहेत. आताच्या लाॅकडाऊनमध्ये निर्बंध हळुहळु शिथील करण्यात येत आहेत.  कमी झालेल्या रूग्णसंख्येमुळे लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

रितेश देशमुखनं मुलासाठी गायली अंगाई, पाहा बाप-लेकाचा क्युट व्हिडीओ

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

दारूसाठी काय पण! जिवाचा आटापिटा करत वाचवली दारू, व्हिडीओ व्हायरल

पुण्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, वाचा आजची आकडेवारी

बारावीच्या परिक्षा रद्द, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More