दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी
मुंबई | राज्यात एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.
दिवसभरात राज्यात 04 हजार 877 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 11 हजार 77 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 53 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 60 लाख 46 हजार 106 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 97 टक्के एवढा झाला आहे.
दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र शनिवारी दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. सर्व मैदानं आणि बागा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालये पुर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असणार आहे.
थोडक्यात बातम्या-
…त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी
मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; वाचा आकडेवारी
मेट्रोच्या ट्रायल रनवरून चंद्रकांत पाटील भडकले; अजित पवारांवर निशाणा साधत म्हणाले…
‘दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव’; अरविंद सावंत संतापले
Comments are closed.