बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबई | राज्यात एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

दिवसभरात राज्यात 06 हजार 005  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 06 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 177 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 61 लाख 10 हजार 124 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 97 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री 8 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र शनिवारी दुकानं दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. सर्व मैदानं आणि बागा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालये पुर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेला मोठा धक्का! तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री राहिलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

‘एक चांगला कलाकार बनून सेटचा निरोप घेत आहे’, अक्षय कुमारच्या पोस्टनंतर चाहते भावूक

मनसे आमदार राजू पाटील यांची तळीये दरडग्रस्तांना 11 लाखांची मदत

अभिमान बाळगण्यापेक्षा सिंधूची जात शोधण्यात भारतीय व्यस्त; ‘हे’ राज्य आघाडीवर!

दिलासादायक! मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More