मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे.
दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, आज 322 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 1 हजार 559 सक्रिय रूग्णसंख्या आहे.
महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, पण आतातरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 5 हजार 651 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘ही’ 3 लक्षणं असतील तर सावध व्हा; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची लक्षणं आली समोर
विकेंड लॅाकडाऊनबद्दल सर्वात मोठी अपडेट, सरकारनं ‘या’ लोकांना दिली सूट
‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांसह पालकांना ‘हा’ महत्वाचा सल्ला
पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
“अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.