महाराष्ट्र मुंबई

राज्यात दिवसभरात तब्बल 811 कोरोनाचे नवे रुग्ण; एकूण आकडा 7,628 वर

मुंबई | राज्यात आज तब्बल 811 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 628 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे आज दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 323 वर पोहोचली आहे. राज्यात आज 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 1 हजार 76 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 13, पुणे महानगरपालिकेतील 4, तर मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धुळे, सोलापूर येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, या 22 मृत्यूंपैकी 13 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या