बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज राज्यात 1230 नवे कोरोनाबाधित; पाहा तुमच्या जिल्ह्यात किती रूग्ण….

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज १२३० नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५८७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४७८६ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १८ हजार ९१४ नमुन्यांपैकी १ लाख ९३ हजार ४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २३ हजार ४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४८ हजार ३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार १९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३ , ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे.

याशिवाय उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २३ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ टक्के ) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १४,५२१ (५२८)

ठाणे: १२५ (२)

ठाणे मनपा: ९२७ (१०)

नवी मुंबई मनपा: ८९८ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: ३६६ (३)

उल्हासनगर मनपा: ३०

भिवंडी निजामपूर मनपा: ३२ (२)

मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)

पालघर: ३७ (२)

वसई विरार मनपा: २४९ (१०)

रायगड: १२३ (१)

पनवेल मनपा: १३९ (२)

ठाणे मंडळ एकूण: १७,६६१ (५६६)

नाशिक: ६०

नाशिक मनपा: ४०

मालेगाव मनपा: ५९५ (३४)

अहमदनगर: ५४ (३)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ९ (३)

धुळे मनपा: ४५ (३)

जळगाव: १४५(१२)

जळगाव मनपा: ३५ (७)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १०१५ (६४)

पुणे: १६६ (५)

पुणे मनपा: २४७८ (१४९)

पिंपरी चिंचवड मनपा: १४७ (४)

सोलापूर: ९

सोलापूर मनपा: २८७ (१६)

सातारा: १२१ (२)

पुणे मंडळ एकूण: ३२०६ (१७६)

कोल्हापूर: १३ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३३

सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)

सिंधुदुर्ग: ६

रत्नागिरी: ४२ (२)

कोल्हापूर मंडळ एकूण: १०४ (४)

औरंगाबाद:९३

औरंगाबाद मनपा: ४९१ (१४)

जालना: १४

हिंगोली: ६०

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६६० (१५)

लातूर: २६ (१)

लातूर मनपा: ५

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ४

नांदेड मनपा: ४१ (४)

लातूर मंडळ एकूण: ८० (५)

अकोला: १८ (१)

अकोला मनपा: १४४ (१०)

अमरावती: ५ (२)

अमरावती मनपा: ७८ (११)

यवतमाळ: ९७

बुलढाणा: २५ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ३६८ (२५)

नागपूर: २

नागपूर मनपा: २५७ (२)

वर्धा: १ (१)

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २६६ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण: २३ हजार ४०१ (८६८)

ट्रेंडिंग बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारकपात होणार का?; मोदी सरकारने केला मोठा खुलासा

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्र सरकारने मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावं- उद्धव ठाकरे

पुणे विभागात आतापर्यंत 1237 रूग्ण ठणठणीत; पाहा प्रत्येक जिल्ह्यातील रूग्णांची आकडेवारी

‘भारतापेक्षा अमेरिका माझ्या मुलांसाठी अधिक सुरक्षित’; लॉकडाउनमध्ये सनी लिओनी पोहोचली अमेरिकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More