बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजभवनात जाऊन काड्या करणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही- संजय राऊत

मुंबई | सध्याच्या संकटप्रसंगी विरोधी पक्षाने ही ताकद ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत सरकारबरोबर उभी केली असती तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. मात्र राजभवनात जाऊन तक्रारीच्या काड्या घालायच्या हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, अशी जोरदार टीका शिसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यातील विरोधी पक्ष भाजपवर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विरोधी पक्ष आकड्यानं ताकदीचा आहे पण ऊठसूट सरकारवर टीका करणं हे चांगलं नाही. जे कोणी करोना संकटाचे राजकारण करू इच्छितात त्यांचे राजकारण जनताच चुलीत टाकेल, असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नेते नाहीत तर राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत याचे भान विरोधी पक्षनेत्यांनी ठेवायला हवे. मात्र विरोधी पक्षाची जास्त ऊठबस राजभवनावर सुरू आहे. अर्थात हीच आपली लोकशाही असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, देशांतील काही राज्यांतील राज्यपाल लोकनियुक्त सरकारला डावलून परस्पर प्रशासनाला आदेश देत आहेत. त्यामुळं समन्वयात अडचणी येऊ शकतात, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडंच पंतप्रधान मोदींकडं केली होती. त्याच विषयावर भाष्य करताना आजच्या अग्रलेखातून टीका केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- चित्रा वाघ

वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!

महत्वाच्या बातम्या-

आयपीएलमधील या संघाने कोरोना बाधितांसाठी दिले तब्बल 10 कोटी

इस्लामपूर कोरोनामुक्त…. जयंत पाटील चिंतामुक्त!

पुण्यातल्या 5 जणांची कोरोनावर मात; महापौर मोहोळ यांची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More