बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा; पाहा आजचे सकारात्मक आकडे

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

आज महाराष्ट्रात 6 हजार 479 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 04 हजार 110 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 157 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 63 लाख 10 हजार 194 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 60 लाख 94 हजार 896 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 78 हजार 962 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली पण कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या –

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मोदी सरकारकडुन प्रत्येकी 2 हजार रूपये

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

#Tokyo_Olympic2021 कांस्यपदक मिळवुन पी.व्ही सिंधु ठरली दोन पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला

पुणे कोरोनामुक्त होतंय! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! रिक्त पदे भरण्याचा शासननिर्णय जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More