Maharashtra Districts Division | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांचे (Districts) विभाजन (Division) होऊन राज्यात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचा दावा केला जात आहे. (Maharashtra Districts Division)
२६ जानेवारी (January 26) रोजी याबाबतची घोषणा (Announcement) सरकारकडून (Government) केली जाणार असल्याचेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. या मेसेजसोबत कथित नवीन जिल्ह्यांची यादी (List) देखील देण्यात आली आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया (Mixed Reactions) उमटत आहेत.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सोशल मीडियावर अनेकांनी आपले शहर (City) जिल्हा (District) होणार, म्हणून अभिनंदन (Congratulation) करायला सुरुवात केली आहे, तर काहींनी मूळ जिल्ह्याचे विभाजन नको, अशी भूमिका घेत या निर्णयाला विरोध (Opposition) केला आहे. मात्र, या व्हायरल फोटोमागचे सत्य वेगळेच आहे.
व्हायरल मेसेज खोटा (Fake)
राज्यात नवीन २१ जिल्हे निर्माण करण्याचा सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. याबाबतचा कुठलाही प्रस्ताव सरकारकडे देण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये केला जाणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Districts Division)
व्हायरल मेसेजमधील (Viral Message) दावे
राज्यात २६ जानेवारी २०२५ रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे.
राज्यातील ३५ पैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन नव्या २१ जिल्ह्यांची निर्मिती होणार.
सध्या राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत. (व्हायरल मेसेजमध्ये ३५ जिल्हे असल्याचा चुकीचा दावा करण्यात आला आहे.)
भुसावळ (Bhusawal), उदगीर (Udgir), अंबाजोगाई (Ambajogai), मालेगाव (Malegaon), कळवण (Kalwan), किनवट (Kinwat), मीरा भाईंदर (Mira Bhayandar), कल्याण (Kalyan), माणदेश (Mandesh), खामगाव (Khamgaon), बारामती (Baramati), पुसद (Pusad), जव्हार (Jawhar), अचलपूर (Achalpur), साकोली (Sakoli), मंडणगड (Mandangad), महाड (Mahad), शिर्डी (Shirdi), संगमनेर (Sangamner), श्रीरामपूर (Shrirampur) आणि अहेरी (Aheri) हे नवीन जिल्हे निर्माण केले जाणार.
या व्हायरल मेसेजमुळे नागरिकांमध्ये (Citizens) संभ्रम (Confusion) निर्माण झाला आहे. मात्र, हा मेसेज पूर्णपणे खोटा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Maharashtra Districts Division)
Title : Maharashtra Districts Division The truth behind viral social media message