बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही, मुख्यमंत्री जनता ठरवेल- अमोल कोल्हे

अहमदनगर | भाजप-सेना यांच्या मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी वेगवेगळ्या यात्रा सुरु आहेत. मुख्यमंत्री जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्र कोणाचीही जहागिरी नाही, असं मत राष्ट्रवादीचे शिरुर खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला अहमदनगरपासून सुरवात झाली. यात्रेच्या शुभारंभावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दुष्काळ आणि पूरग्रस्तांना मदत न करता मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडून निवडणुकीसाठी यात्रा काढण्यात येत आहेत. सरकारने गेल्या पाच वर्षात काय काम केलं?? असा प्रश्न जनतेला पडला आहे, असं म्हणत कोल्हेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. या प्रक्रियेला विरोध आहे. लोकशाहीत असे निर्णय घातक आहेत, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-दीदी, तुम्ही दिलेला शब्द न पाळताच सोडून गेलात; स्मृती इराणींचं भावूक ट्विट

-“प्रत्येकाशी जुळवून घेण्याची सुषमा स्वराज यांची वृत्ती कायम लक्षात राहील”

-“तुम्ही मंगळावर अडकलात तरी भारतीय दुतवास तुमच्या मदतीसाठी धावून येईल”

-आई…अशी कशी निघून गेलीस!; सुषमा स्वराज यांचा ‘तो’ व्हीडिओ होतोय व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More