Maharashtra Election 2024 | विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी आपले अर्ज देखील मोठं शक्तीप्रदर्शन करत दाखल केले आहेत. अशात प्रचाराला निघालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. (Maharashtra Election 2024 )
जळगाव येथून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना ममुराबाद गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली असून दोन ब्लॉकेज निघाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रभाकर आप्पा सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका
रुग्णालयात प्रभाकर सोनवणे यांना बघण्यासाठी नातेवाईक मित्र परिवारासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.त्यांची प्रकृती सध्या ठीक असून ते रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. प्रभाकर सोनवणे यांना ठाकरे गटाच्या अगदी शेवटच्या यादीत उमेदवारी देण्यात आली.अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. (Maharashtra Election 2024 )
निवडणुकीसाठी ते प्रचाराला जात असतानाच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आता प्रभाकर आप्पा सोनवणे यांची तब्येत चांगली असून लवकरच बरे होऊन प्रचारामध्ये ते सहभागी होतील, अशी माहिती प्रभाकर सोनवणे यांचे चिरंजीव दिनेश सोनवणे यांनी दिली आहे.
चोपडा विधानसभामधून सोनवणे रिंगणात
दरम्यान, चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे आणि उद्धव ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे यांच्यात सामना होणार आहे. ठाकरे गटाने चोपडा विधानसभा मतदारसंघातून आधी राजू तडवी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी तडवी यांची उमेदवारी रद्द करून ती प्रभाकर सोनवणे यांना जाहीर झाली. (Maharashtra Election 2024 )
News Title – Maharashtra Election 2024 Prabhakar Sonawane suffered a heart attack
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
अजित पवारांना धक्का, सोलापुरात तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी हाती घेतली तुतारी
लक्ष्मीपूजनापूर्वीच सोनं महागलं; जाणून घ्या आजचे लेटेस्ट भाव
भाजपचे ‘हे’ 12 नेते शिंदेंच्या धनुष्यबाणावर तर 5 जण घड्याळच्या तिकिटावर रिंगणात!
ऐन दिवाळीत उडणार महागाईचा भडका?, 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नियमांत बदल होणार