Maharashtra Exit Poll 2024 | 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागून आहे. कोणाचं सरकार पुन्हा देशात येणार? याची उस्तुकता सर्वांना लागली आहे. मात्र निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील तर महायुतीला 24 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला 9 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या एक्झिटपोलमध्ये वर्तवण्यात आलाय.
शिवसेनामध्ये उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले. त्यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करावी लागली. उद्धव ठाकरे यांना नवा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला मोठा धक्का बसणार असा अंदाज आहे. महायुतीला 24 तर मविआला 23 जागा जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप 17 आणि शिंदे गटाला 6 आणि अजित पवारांना केवळ एका जागेवर विजय मिळेल असा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध ज्योतिष अनिल थत्तेंची निकालाआधी मोठी भविष्यवाणी, म्हणाले…
अत्यंत आळशी पण तेवढेच बुद्धिमान असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक
काँग्रेस किती जागा जिंकणार?; नाना पटोलेंनी सांगितला आकडा
आयुष्यात यश मिळवायचं असेल तर ‘या’ सवयी आजच सोडा!
अपघातानंतर पोलिस आयुक्तांना फोन केला होता का?; अजित पवारांचा मोठा खुलासा