१ जूनपासून शेतमालाची विक्री बंद, बळीराजाचा एल्गार

पुणतांबा, अहमदनगर

अहमदनगर | शेतकऱ्यांनी इशारा देऊनही राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे येत्या १ जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगरमधील पुणतांब्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी कर्जमाफीने सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्या, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यासाठी सरकारला अल्टिमेटमही देण्यात आलं होतं. मात्र आता १ जूनपासून शेतमालाची विक्री थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या