पुणे

“महाराष्ट्र आमच्या हातात द्या, सुतासारखा सरळ करु”

पुणे : मी एक तृतीयपंथी  म्हणून  मागणी करते.  राज्याची सत्ता आमच्या हातात द्या, चॅलेंज देऊन सांगते, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करु. आज आमच्या तृतीयपंतीयांना जाग येत आहे,  असं वक्तव्य  तृतीयपंथी असलेल्या चांदणी गोरे यांनी केले आहे. 

सर्वसामान्य जनतेचे  हाल का होत आहेत. कांद्याचे दर किती वाढले आहेत. महिला असुरक्षित का आहेत?…शेतकऱ्यांचे किती हाल चालले आहेत. पिकांचे नुकसान आणि  त्यांच्या विम्याचे प्रकरण, या सगळ्याने कुठून नेऊन  ठेवलाय  महाराष्ट्र माझा? असं म्हणण्याची वेळ आल्याचं चांदणी  गोरे म्हणाल्या,

राज्याचे राज्यपाल नागपूरवाल्यांचं ऐकतात की राष्ट्रपती गुजरातवाल्यांचं ऐकतात, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. सत्ता नेमकी कधी स्थापन होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे, असंही चांदणी यांनी म्हटलंय.  

राज्यात अजून सरकार स्थापन होऊ शकले नाही असं का होत आहे, असाही प्रश्न चांदनी यांनी उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून  तीन आठवडे उलटले असले  तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. सत्ता कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे.

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

 

महत्वाच्या बातम्या- 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या