बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केलं- देवेंद्र फडणवीस 

अमरावती | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात लसीकरणाला वेग आला आहे. राज्यात सोमवारी पाच लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं होतं. या लसीकरणाने विक्रमी नोंद केली होती. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संपूर्ण देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केलं. आता 1 मे पासून 18 ते 45 हा वयोगट सुद्धा पात्र झाला. कोविशिल्डच्या मे अखेरपर्यंत 10 कोटी, कोवॅक्सिनच्या 3 कोटी, तर ऑगस्टपर्यंत 6 कोटी लसी येत आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

कल्पना करा की, भारताला लसी आयात कराव्या लागल्या असत्या तर काय स्थिती असती?, भारताने स्वत:ची लस तयार केली ही खूप मोठी उपलब्धी आहे. एकदम सर्व लस उपलब्ध होणार नसल्याने प्राधान्यक्रम ठरवावाच लागेल, असंही फडणवीस म्हणाले. याआधी महाराष्ट्राने लसीकरणात दीड कोटींचा टप्पा देखील ओलांडला. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील विक्रमी लसीकरणाबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केलं होतं.

दरम्यान, केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा अद्यापही कायम असल्याने, 1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची धक्कादायक आकडेवारी

“आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…”

‘मिशन ऑक्सिजन’साठी क्रिकेटचा देव’ मदतीला धावला, केलं मोठं दान

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

काय सांगता! पोलार्डने बॅटने नाही तर हेलमेटने मारला चौकार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More