मुंबई | विविध उपायांचा अवलंब करुनही कोरोनाचा सामना करण्यात महाराष्ट्र अपयशी ठरतंय का?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्याला कारण आहे महाराष्ट्राची गेल्या २४ तासातील कोरोनाची धक्कादायक आकडेवारी…
महाराष्ट्रात आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद शुक्रवारी झाली. दिवसभरात राज्यात तब्बल 2940 कोरोनाचे नवे रुग्ण वाढले आहेत. त्यातली सर्वाधिक वाढ ही मुंबईत दिसून आली. मुंबईत 1751 रुग्ण वाढले आहेत, तर पुण्यात दिवसातील आतापर्यंतच्या सर्वाधिक 291 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यभरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येनं देखील दीड हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 63 मृत्यू नोंदवले गेले आहेत. त्यामुळे कोरोनाने मृत्यू पडलेल्यांची संख्या 1517 झाली आहे.
राज्य सरकारच्या शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 44,582 वर पोहोचली आहे. दिवसभरातल्या 63 कोरोना मृत्यूंपैकी मुंबईत 27 आणि पुण्यात 9 मृत्यूंची नोंद झाली आहे. ठाणे शहरातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून आज 186 नवे रुग्ण आढळून आले.
ट्रेंडिंग बातम्या-
पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण
आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका
महत्वाच्या बातम्या-
‘…तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील’; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती
सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी