मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर सरकार दक्ष, ९० कोटींचं हेलिकॉप्टर घेणार!

संग्रहित फोटो

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघातानंतर सरकार दक्ष झालं असून व्हीआयपींसाठी लवकरच ९० कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर विकत घेणार आहे.  राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

सध्या सरकारच्या मालकीची दोन विमानं आणि दोन हेलिकॉप्टर आहेत. त्यापैकी एक विमान सुस्थितीत असून दुसरं बंद पडलेलं आहे. तर निलंग्यातील अपघातानंतर एक हेलिकॉप्टर बंद असून दुसरं हेलिकॉप्टर २०१० पासून बंद आहे. 

त्यामुळे व्हीआयपींच्या प्रवासाठी नव्या हेलिकॉप्टरची लवकरच खरेदी केली जाणार आहे. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या