राज्य सरकारच्या जाहिरातीत दाखवला बँकॉकचा रस्ता!

मुंबई | ‘आपलं सरकार, कामगिरी दमदार’चा दावा करणाऱ्या राज्य सरकारला जाहिरातबाजीसाठी चक्क बँकॉकच्या रस्त्याचा फोटो वापरावा लागलाय. मंत्रालयाच्या तळमजल्यावर हे पोस्टर लावण्यात आलंय. 

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने सरकारची जोरदार ब्रँडिंग करण्यास सुरुवात केलीय. 300 कोटी रुपये त्यासाठी खर्च करणार असल्याचं वृत्त मध्यंतरी आलं होतं. 

दरम्यान, सध्या ‘मी लाभार्थी’ या टॅगलाईनखाली सरकारने जाहिरातबाजी सुरु केलीय. ‘होय, हे माझं सरकार’ अशीही टॅगलाईन वापरण्यात येतेय. अशाच एका जाहिरातीच्या पोस्टरवर बँकॉकच्या रस्त्याचा फोटो वापरण्यात आलाय.

रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना असा फोटो वापरल्यामुळे सरकारला आता मोठ्या टीकेचा सामना करावा लागू शकतो. 

 

Photo- passenger6a.uk