Maharashtra l महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तसेच देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
अशातच आता दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रिपदाची मागणी देखील केली आहे. तर पाहुयात कोणत्या पक्षाला कोणती पदे मिळणार?
भाजपला कोणती मंत्रिपद मिळणार? :
गृह, महसूल, जलसंपदा, गृह निर्माण, वन, ऊर्जा, ग्रामविकास, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, सामान्य प्रशासन ही खाती मिळण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गटाला कोणती पदे मिळणार? :
नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती दिली जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra l अजित पवार गटाला कोणती पदे मिळणार? :
अर्थ, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, आदिवासी विकास, अल्प संख्याक, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज मुंबईत होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
News Title :Maharashtra Government Formation Eknath Shinde demands home ministry
महत्वाच्या बातम्या –
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, PF चे पैसे काढणं होणार सोप्पं
ठरलं! देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?, तर, शिंदे-अजितदादा..
CM पदाच्या बदल्यात शिंदेंना हवीत ‘ही’ मोठी खाती?, अजितदादांच्या वाट्याला काय येणार?
फडणविसांच्या चेहऱ्यावर फूललेलं हास्य अन् शिंदेंचा पडलेला चेहरा..’त्या’ फोटोंची जोरदार चर्चा